ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राणी हिराई प्रभाग संघाच्या अधिवेशनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

समूह, उत्पादक गट व ग्रामसंघांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती भद्रावती अंतर्गत चंदनखेडा-मुधोली प्रभागातील राणी हिराई प्रभाग संघाचे वार्षिक अधिवेशन कर्मवीर सभागृह, चंदनखेडा येथे उत्साहात पार पडले.

प्रभाग संघाचा सन २०२५-२६ चा वार्षिक जमा-खर्च, अहवाल तसेच आगामी वर्षाचे कार्यनियोजन यावेळी महिलांसमोर सादर करून मंजुरी घेण्यात आली. प्रभाग संघाच्या अध्यक्षा उषा रमेश शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनाला तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश रामटेके, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक अक्षय धानके यांच्यासह अभियानातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चरूर येथील जिजाऊ समूह, आष्टा येथील वाल्मीक शिंगाडा उत्पादक गट आणि वायगाव तु. येथील क्रांती ग्रामसंघाचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अभियानाच्या कार्यात ग्रामपंचायत चंदनखेडा यांचे सहकार्य मिळत असल्याने ग्रामविकास अधिकारी प्रकाश रामटेके यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रभागातील महिलांनी सुरू केलेल्या व्यवसाय व उद्योगांच्या यशोगाथांवर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी यांनी महिलांनी उमेदअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर, बँक कर्ज व विविध शासकीय योजनांचा लाभ घेत वैयक्तिक व सामूहिक उद्योगांना चालना द्यावी, असे आवाहन केले. यावेळी शाखा व्यवस्थापक अक्षय धानके यांनी नियमित समूहांचे कौतुक केले.

प्रास्ताविक हर्ष नागपुरे यांनी, तर वार्षिक जमा-खर्च श्वेता भोयर यांनी सादर केला. कार्यअहवाल व नियोजन स्वाती राखुंडे यांनी मांडले. संचालन स्वाती राखुंडे यांनी केले, तर आभार शुभांगी पांढरे यांनी मानले. अधिवेशनाला प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये