सदस्यांच्या सहकार्यामुळेच असोसिएशन प्रगतीपथावर : चंपत आस्वले
भद्रावती तालुका सेवानिवृत्त असोसिएशनची वार्षिक आमसभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वयोमानामुळे शरीर शिथील होऊन उत्साह मावळतो.मात्र, सेवानिवृत्त सदस्यांच्या उत्साहामुळे व त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन ही सतत प्रगतीपथावर असल्याचे मत भद्रावती तालुका सेवानिवृत्त असोसिएशनचे अध्यक्ष चंपतराव आस्वले यांनी व्यक्त केले.स्थानीक पंचायत समिती जवळील जेष्ठ नागरीक भवनात भद्रावती तालुका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनची वार्षिक आमसभा संपन्न झाली त्यात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंपतराव आस्वले, कार्याध्यक्ष विनोद पांढरे, ऊपाध्यक्ष व्हि.के.गारसे,सचीव अशोक वैद्य, कोषाध्यक्ष भाऊराव दहिवलकर,सदस्य उल्हास भास्करवार आदी मान्यवर उपस्थीत होते.
आमसभेत मागील अहवालाचे वाचन,चालु वर्षीचा जमाखर्च, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तथा अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर आलेल्या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.वयाचे पंचाहात्तर वर्ष पूर्ण करणाऱ्या असोसिएशनच्या व्हि.एन.मांडवकर व पुरुषोत्तम पावडे या सदस्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमसभेला जी.एन.ठेंगणे, के.एस.रावळे,जी.जी.वाघमारे, कान्हा दडमल,व्हि.एम.मांडवकर,अविनाश पांपट्टीवार, रेखाताई पबीतवार,आशालता सोनटक्के यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.



