Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला क्रिकेट स्पर्धेत इनरव्हील क्लबचा संघ विजयी

लोकमत सखी मंच संघावर केली मात : ऊत्कृष्ट खेळाडु ठरल्या विजया साव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           शहरातील ग्रेनेज क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या महिलांच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इनरव्हील क्लबच्या संघाने लोकमत सखी मंच संघावर मात करीत विजय संपादन केला. या सामन्यात इनरव्हील क्लब संघाने आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या लोकमत सखी मंच संघावर नऊ गडी राखून विजय मिळविला.

या सामन्यात ऊत्कृष्ट खेळाडु ठरलेल्या विजया साव यांना डॉ. माला प्रेमचंद यांचेकडुन विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नाणेफेक जिंकून इनरव्हील क्लब संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. निर्धारित 10 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करीत लोकमत सखी मंच संघाने चार गडी गमावून 64 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करीत इनरव्हील क्लब संघाने केवळ दोन गडी गमावून सहा षटक आणि तीन बॉल मध्ये 65 धावा करून आपला विजय साजरा केला. विजेत्या संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉक्टर मला प्रेमचंद, डॉक्टर अमित प्रेमचंद, मेघा शेंडे, खातखेडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. विजयी इनरव्हील संघात कर्णधार वर्षा धानोरकर, तृप्ती हिरादेवे, वर्षा पढाल, विजया साव, जयश्री कांबडी, मनीषा ढोमणे, कविता सुफी, विभा बेहरे, विश्रांती उराडे, रश्मी बिसेन,उषा जाधव, प्रतिभा मानकर या खेळाडूंचा सहभाग होता.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वाती चारी, प्रेमा पोटदुखे, वैशाली तेलंग आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये