Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत संपूर्ण गोंडीयन आदिवासी वीर- वीरांगणा जयंती

गोंडराजे महात्मा रावेन यांची भव्य शोभायात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आदिवासी गोंडी पारंपारिक नृत्य स्पर्धा : पारंपारिक वेशभूषा प्रदर्शनचे आयोजन

        येथील गोंडी धर्मीय आदिवासी बहुउद्देशीय संघटनेतर्फे दि. 25 डिसेंबरला संपूर्ण गोंडियन आदिवासी वीर वीरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन नाग मंदिर जवळील जिल्हा परिषद हायस्कूल येथे करण्यात आले आहे. गोंड राजा महात्मा रावेन यांची भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण तेलंगणा इंद्रवेलीचे गायक रवी मेश्राम, मेघराज मेश्राम हे राहणार आहे.

दि. 24 ला दुपारी चार वाजता भिमाल पेन पेनठाणा येथे भिमालपेन मृठ पूजा संदीप पेंदाम यांचे हस्ते होणार आहे. दि. 25 डिसेंला सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय भीवसेन पेंनढाणा येथून महात्मा गोडराजा रावेन यांची भव्य शोभायात्रा निघणार असून या रॅलीचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर व उ. बा. ठा. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांचे शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बीपीन इंगळे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी 2.00 वाजता प्रबोधनात्मक कार्यक्रम तर सायंकाळी 6.00 वाजता पारंपारिक गोंडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक 20750, दुतीय 15750 तर तृतीय 10750 रुपये ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गोडवाना ट्रान्सपोर्टचे मधुकर मेश्राम यांचे शुभहस्ते होणार आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश दादा पेंदाम, विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे आमदार तुलेशवर मरकाम, सुवर्णा वरखडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. येडमा भोजजृ, हरीश ऊईके, डॉ. प्रवीण येरमे, बी.डी मडावी, दीप्ती मरकाम, पुनम गेडाम, सविता टेकाम, रमेश मेश्राम, जितेंद्र कुळमेथे, शुभम मडावी व नंदकिशोर कुंमरे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे पर्यवेक्षक सुप्रसिद्ध गोंडी गायक रवी मेश्राम, मेघराज मेश्राम, विद्या कन्नाके राहणार असून उपरोक्त कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन गोंडी धर्मीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम, विनोद शेडमाके, गोलु गेडाम, पिंटू मडावी, संदीप कुंमरे, गंगाधर गेडाम, महादेव सिडाम, राजेंद्र मडावी, प्रकाश चिकराम,संदीप नैताम, भास्कर वरखडे, जितेंद्र मरसकोल्हे, प्रदीप मडावी, महादेव सीडाम, संदीप कुंमरे, संदीप नैताम व निरंजन आत्राम आदींनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये