Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उदयकुमार सुरेश पगाडे यांना सामाजिक क्षेत्रासाठी मानद ‘डॉक्टरेट पदवी’ पुरस्कार

आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वात कमी वयातील पुरस्कार्थीचा विशेष मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

जागतिक स्तरावर मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या “ग्लोबल इंटरनॅशनल फॉउंडेशन टीम, दिल्ली (G.I.F.T.)” संस्थेमार्फत आयोजित दि.17 डिसेंबर 2023 रोजी रविवारला पवार सभागृह, नागपूर येथे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, पर्यावरण अश्या अनेक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या राज्यातील फक्त 10 व्यक्तींची विशेष निवड करून, त्यांना “मानद डॉक्टरेट पदवी पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

ह्या सुंदरश्या पुरस्कार सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी क्षेत्रात गेल्या 9 वर्षांपासून सामाजिक कार्य करणारे युवा समाजसेवक श्री.उदयकुमार सुरेश पगाडे (29) यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्धल “मानद डॉक्टरेट पदवी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, ह्या पुरस्कार सोहळ्यात सर्वात कमी वयाचे “मानद डॉक्टरेट पदवी” मिळविणारे, उदयकुमार पगाडे हे एकमेव मानकरी ठरले आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थी असतांनाच श्री.उदयकुमार पगाडे यांनी अनेक समविचारी युवकांना एकत्रित करून “न्यु लाईफ बहूउद्देशिय संस्था, ब्रम्हपुरी” ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. त्यामार्फत दरवर्षी वृक्षारोपण, गरजूंना कपडे दान, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर, अनेक आंदोलनात /मोर्च्यात सहभाग, आत्मरक्षा शिबीर, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, महापुरुषांचे जयंती व पुन्यतिथी साजरे करणे, अन्यायाच्या विरोधात निवेदने, आरोग्यविषयक मदत, रक्तदान शिबीर, असे अनेक समाजपयोगी उपक्रम मागील 9 वर्षांत यांनी राबविले आहेत. आणि ह्याआधी सुद्धा यांना अनेक नावाजलेल्या संस्थेमार्फत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 2021 मध्ये जगविख्यात समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते “जिनिअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” हा जागतिक पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2023 मध्ये नगर परिषद ब्रम्हपुरी मार्फत “मेरी माटी – मेरा देश” योजनेचा ब्रँड अंबेसिडर म्हणून निवड करण्यात आली. आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय, आणि 50 पेक्षा जास्त जागतिक पुरस्कारावर यांनी आपले स्वतःचे नाव कोरले आहे..

ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ.मनीषा ठाकरे मॅडम, राजकीय नेत्या सौ.माधुरी पालिवाल मॅडम, श्री.किताबसिंग चौधरी सर, व अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची विशेष उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये