Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विनयभंग व छेडछाड प्रकरणात आरोपीस एक वर्षाचा कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील एका गावातील महिलेसोबत छेडछाड करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सावली प्रथमवर्ग न्यायालयाने १ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सावली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री अक्षय जगताप यांनी दिनांक 18/12/23 रोजी हा निकाल दिला. कमलाकर भाऊजी झरकर (वय 35 वर्षे) रा कवठी तालुका सावली असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सावली तालुक्यातील एका गावात फिर्यादी महिला शेतात एकटी काम असल्याचे संधी साधून आरोपी कमलाकर भाऊजी झरकर (वय 35 वर्षे) रा कवठी याने तीचेशी छेडछाड करून विनयभंग केल्याची घटना ऑगस्ट 2021 रोजी घडली होती. याप्रकरणी सावली पोलिसात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस उपनिरीक्षक शाशिकर चीचघरे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात आरोप पत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज प्रथमवर्ग न्यायालयात सुरू असताना सरकारी अभियोक्ता श्री अवी डोलकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. तसेच पैरवि अधिकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री सादिक शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.न्यायदंडाधिकारी श्री अक्षय जगताप यांनी आरोपीस भादंवि कलम 354 खाली 1 वर्ष कारावासाची शिक्षा तसेच 5 हजाराचा दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाच्या अधिक कारावासाची शिक्षा सुनावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये