Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी २० डिसे. ला. ,जय्यत तयारी सुरु.

चांदा ब्लास्ट –
चंद्रपूर :—–

कौशल्य, रोजगार उद्योजकता व ना विन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय अंतर्गत संपुर्ण
राज्यभरात जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी
आयोजीत करण्यात येत असून चंदपूर
जिल्यात तंत्र प्रदर्शनी चे आयोजन भव्य स्तरावर २० डिसेंबर ला शाशकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था
चंद्रपूर येथे करण्यात आले
आहे.

संपुर्ण चंदपूर जिल्यातील शाशकिय, अशाशकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था यात सहभागी होणार असून यात जिल्हाभरातून शेकडो मॉडेलस
व मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित
होणार असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवींद्र
मेहंदळे यांनी कळविले आहे.

सदर तंत्र प्रदर्शनी चे उदघाटन नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडवाले यांचे हस्ते होणार असून एम.आय.डि.सी. चंदपूर चे चेअरमन
मधुसुदन रूंगठा, शिक्षणमहषीं पांडुरंग
आंबटकर हे प्रमुख अतिथी असणार
आहेत.

या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीतून १० मॉडेलस ची राज्य स्तरीय प्रदर्शनी करिता निवड करण्यात येणार असून
राज्य स्तरीय प्रदर्शनीत् राज्यातून निवडक ३६० मॉडेल्स सहभागी होणार असल्याचे रवींद्र मेहंदळे यांनी
सांगितले.

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी चे नियोजनाकरिता विविध समित्या
तयार करण्यात आल्या असून जय्यत
तयारी सुरु असल्याचे प्रा.महेश पानसे प्रा. गुणवंत दर्वे, शालिक फाले, प्रभाकर धोटे, अमोल धात्रक, व इतर
नियोजन समिती सदस्यानी कळविले
आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये