Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या आरोग्य शिबिरात ७०० नागरिकांची वैद्यकीय तपासणी

यावेळी औषधी व गरजूंना चष्मा वितरण करण्यात आले.

चांदा ब्लास्ट

           रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बंगाली कॅम्प येथील पोद्दार पब्लिक हायस्कूल येथे १७ डिसेंबरला भव्य आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा ७०० हून अधिक नागरिकांना लाभ घेतला. यावेळी औषधी व गरजून चष्मा वितरण करण्यात आले.

         या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे डॉ. संध्या अरुण कुलकर्णी, डॉ. अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. मुख्य अतिथी डॉ. अमल पोद्दार, विशेष अतिथि म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश ऊर्फ रामू तिवारी, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप यादव, सचिव कुंजबिहारी परमार, प्रकल्प निर्देशक संजय उपगानलावार, डॉ. प्रनिता ओसवाल, तसेच माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, सचिन गांगरेड्डीवार, अजय पालरपवार, राम चांदे, संदीप रामटेके, महेश उचके, अनुप बोर्डे, रवींद्र जैन, संतोष तेलंग, अजय बल्की, अविनाश रघुसे, नवीन चोरडीया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या रोगनिदान शिबीराला डॉ. अरुण कुलकर्णी, डाॅ. संध्या कुलकर्णी, डॉ, शिमला, डॉ. प्रणिती ओसवाल, डॉ. राम भरत, डॉ. सत्यजित पोद्दार, डॉ. राकेश कोलावार, डॉ. सचिन जाधव, डॉ. कमलजीत, डॉ. हर्षदा, डॉ. अल्का, डॉ. मनोज, डॉ. सुमित कुंभारे, डॉ. प्रशाला, डाॅ. अलोक जोशी. डॉ. निरंजन मंगरूळकर यांची उपस्थिती होती.

         कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी तर आभार सचिव कुंजबिहारी परमार यांनी केले. या शिबीराचा ७०० हून अधिक नागरिकांना लाभ घेतला. यावेळी नागरिकांना औषध व चष्मा वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीमंतयोगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन, जगदंब शिव सार्वजनिक उत्सव समिती शामनगर, संकल्प बंगाली कॅम्प चंद्रपूर, कल्पतरू धम्म प्रसारक मंडळ, साची बुद्ध विहार, प्रेरणा बुद्ध विहार, आम्रपाली बहुउद्देशीय महिला मंडळ, सिद्धार्थ बहुउद्देशीय मंडळ, सम्राट बुद्ध विहार, बहुउद्देशीय एकता पंचशील मंडळ, रक्तदान महादान निस्वार्थसेवा, फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थांनी सहयोग केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये