वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन नुकसान भरपाईची नुकसान भरपाई द्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किशोर टोंगे यांची आग्रही मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
यावर्षी सोयाबीन पिकावर पडलेल्या ‘येलो मोझॅक’ रोगामुळे सोंगणीपूर्वीच सोयाबीनचे पाने पिवळे पडून सोयाबीन उत्पन्न नष्ट झाले असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे.
यासाठी आम्ही आंदोलने केली, निवेदने दिली आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी ‘येलो मोझॅक’ रोगामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळेल यासाठी तो सरकाराकडे डोळे लावून होता. मात्र आमच्या शेतकऱ्यांना अजूनही कुठलीही शासकीय मदत मिळाली नाही त्यामुळे आमचा शेतकरी बांधव अस्वस्थ असून तो नैराश्यात आहॆ असं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सोयाबीन उत्पादक क्षेत्र म्हणून आमचे वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहॆ. यासाठी आपल्या स्तरावरून सरकारने तातडीने लक्ष घालून शेतकरी बांधवाना न्याय द्यावा अशी मागणी किशोर टोंगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.



