ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिमूर वरोरा मार्गांवर वळण रस्ता फलक लावण्यास संबंधित कंत्राटदार विसरले.

भाजयुमो चिमुर शहर ने स्व खर्चाने लावले वळण रस्ता फलक.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

               चिमूर वरोरा मार्गांवर केसीसी कंपनी मार्फत रस्ता बांधकाम सुरू आहे. परंतु शेंडेगाव जवळ वळण रस्ता फलक न लावल्याने अपघात होत आहे. परंतु संबंधित बांधकाम एजन्सी वळण रस्ता फलक लावणे विसरले असल्याने भाजयुमो चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर यांनी दखल घेत त्या ठिकाणी वळण रस्ता फलक लावून एक सामाजिक उपक्रम केला.

    चिमूर वरोरा मार्गांवरील शेंडेगाव जवळ एका बाजू चे पूर्ण झाले नाही. त्यामुळे वाहने भरधाव वेगाने जाऊन अपघात होत आहे. त्या ठिकाणी संबंधित बांधकाम एजन्सी ने वळण रस्ता फलक लावणे विसरले आहे. तेव्हा भाजयुमो चिमूर शहर बंटी वनकर यांच्या नेतृत्वात वळण रस्ता फलक लावले आहे.

    यावेळी भाजयुमो शहर महामंत्री श्रेयस लाखे, नरेंद्र हजारे, अमित जुमडे,राजू बोडने,भूषण सातपुते,रवी ननावरे, भारती गोडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये