ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा डिव्हीजन पथक यांनी 4 लाख 04 हजारावर देशी विदेशी दारूचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 17/12/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी आरोपी यांचा पाठलाग करून थुल लेआउट सिंधी मेघे, वर्धा येथे आरोपीवर प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावरून आरोपी नामे नामे प्रज्वल सुभाष चचाने वय 24 वर्ष रा. रेल्वे गेट जवळ, पुलफैल, वार्ड.न.26 वर्धा हा देशी/विदेशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आले त्याचे ताब्यातुन 1) एक मारोती सुजुकी झेन कंपनीची चारचाकी वाहन क्र एम.एच. 31 सी.एम. 0598 किंमत अंदाजे 3,50,000/- रू त्या मध्ये रॉयल स्टॅग कंपनिच्या, ऑफीसर चाव्हाईस ब्लु, ऑफीसर चाव्हाईस, टुबर्ग कंपनिच्या बियर व टॅगों कपंनीच्या देशी दारूच्या अश्या वेग वेगळ्या कपंनीच्या देशी/विदेशी दारूच्या 287 शिश्या दारू की. की. 44,400 रू 2) एक रियलमी कपंनीचा मोबाईल, 10,000/- रू असा एकुण जु. किंमत 4,04,400/-रू. चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.

आरोपीने देशी/विदेशी दारू माला बाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी सांगीतले की, विदेशी दारूचा माल हा Leopold-9 नावाने असलेल्या रेस्टॉरेन्ट व बार चे चालक / मालक नयन चिंतलवार पत्ता सावंगी आसोला जि. नागपुर यांचे बार मधुन आणल्याचे सांगीतल्याने नयन चिंतलवार पत्ता सावंगी आसोला जि. नागपुर यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपी यांस दारूचा माल देवुन त्यांना सहकार्य केल्याने त्यांचे कृत्य कलम 82, म.दा.का. प्रमाणे होत असल्याने नयन चिंतलवार पत्ता सावंगी आसोला जि. नागपुर यांना आरोपी बनविण्यात आले.

केलेल्या कार्यवाही संबधी पोलीस स्टेशन रामनगर, येथे आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 986/2023 कलम कलम 65 अ ई, 77 अ, 82 83, म.दा. का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के मकेश्वर सा. याचे सुचनेप्रमाणे, पो.उप.नि परवेज खॉन, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, प्रमोद वाघमारे, तसेच सायबर सेलचे विशाल मडावी. यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये