ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चेक फुटाणा येथे रस्त्यात ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या नांगराला दुचाकीची धडक; एक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी

सामाजिक कार्यकर्ते बंडू बुरांडे यांनी जखमींना केली मदत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :- तालुक्यातील चेक फुटाणा येथे रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या नांगराला दुचाकीची धडक लागून एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दि.(३ मार्च) धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजता घडली.दशरथ मडावी, वय (३५) रा.सातारा कोमटी असे गंभीर जखमीचे व प्रतीक लाला वनकर वय (३२) रा.सातारा कोमटी असे किरकोळ जखमीचे नाव आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडू बुरांडे यांनी तत्परता दाखवत जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून सामाजिक जबाबदारी पार पाडली.एकीकडे रंगपंचमीचा सण असतांना सुद्धा बंडू बुरांडे यांनी केलेल्या सहकार्यासाठी जखमीनी आभार व्यक्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार दशरथ मडावी व प्रतीक वनकर हे दोघे पोंभुर्णा येथून नांदगावकडे दुचाकीने जात होते. चेक फुटाणा गावातील रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरचा नांगर ठेवलेला असल्याने व दुचाकी चालकाला अंदाज न आल्याने दुचाकीची ट्रॅक्टरच्या नांगराला धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्यामध्ये दशरथ मळावी हा गंभीर जखमी झाला.यात त्याच्या कानाला मोठी दुखापत झाली.तर प्रतीक वनकर हा किरकोळ जखमी झाला.घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने मदत करत दोघांनाही रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी ठेवले.चेक फुटाणा येथील नेहरू मोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते बंडू बुरांडे यांना फोन करून बोलावले. त्यानंतर त्यांच्या चारचाकी वाहनातून जखमींना पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.प्राथमिक उपचार करून दोघांनाही सुखरूप घरी सोडण्यात आले.

गावकऱ्यांनी रस्त्यावर शेतीची अवजारे किंवा वाहने बेपर्वाईने ठेवू नये अन्यथा अशा अपघातांना आमंत्रण मिळत असते अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये