ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांची आकस्मितेपणे वाहतूक शाखा व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे तपासणी करण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 28/7/2023 रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा दुपारी 4 वाजताच्या दरम्यान वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री नुरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती व प्रवाशांच्या सोयीसाठी समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पोलिस अधीक्षक श्री नुरुल हसन वर्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री समीर आयुब शेख वर्धा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री जगताप शिक्षणाधिकारी प्राथमिक वर्धा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनीत घागे शाखा वर्धा एस टी महामंडळाचे अधिकारी वर्धा वर्धा जिल्हा स्कूल संघटनेचे प्रतिनिधी शाळेचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधीक्षक श्री नुरुल हसन यांनी स्कूल बस सुरक्षेते बाबत आणि स्कूल बस नियमावली एस ओ पी बनविण्यासाठी निर्देश दिले असून तसेच वाहनांमध्ये अग्निशमन यंत्र असणें आवश्यक आहे वाहनांमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थीची वाहतूक न करणे तसेच मुलींची वाहतूक करणाऱ्या बसेस मध्ये महिला कंडक्टर असणे इत्यादी बाबीची तपासणी वाहतूक पोलीस व परिवहन विभागामार्फत करण्याचे निर्देश दिले तसेच वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण शाळेच्या मुख्याध्याप आणि मुख्याध्यापिका यांची ऑनलाईन मीटिंग घेण्याबाबत निर्देश दिले योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांची आकस्मितेपणे वाहतूक शाखा व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे तपासणी करण्याचे निर्देश दिले तसेच सभेच्या शेवटी शेवटी वर्धा जिल्हाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री समीर आयुब शेख यांनी बैठकीत आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थितांचे आभार मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये