Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांची कारवाई

आरोपीताचे ताब्यातून १० किलो वजनाचा "गांजा "(अंमली पदार्थ) सह एकूण किं. 2 लाख 20 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे कि, दि. 28/07/2023 चे 16.10 वा ते 19.05 वा वा.रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. वर्धा शहर येथे अवैध धंद्याविरुद्ध कारवाई ची मोहीम राबवत असताना गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांचे परवानगीने ndps कायद्यान्वये तरतुदींचे पालन करून सदर आरोपी यांचे घरी रेड केली असता आरोपी 1) रंजीत उर्फ काल्या देशराज लोंगबरसे , वय 40 वर्ष रा. फुलफैलं , वर्धा. चे घरझडतीत बॅग मध्ये सेलो टेप ने गुंडाळलेल्या 5 मोठ्या प्लास्टिकच्या पन्नीमध्ये 10 किलो ग्रॅम वजनाचा गांजा (अमली पदार्थ) किंमत प्रती किलो20,000 रू प्रमाणे की -2,00,000/- रुपये.चा व आरोपी यांचे वापरातील 02 अँड्रॉइड मोबाईल की 20,000/- रू असा जुमला किमत 2,20,000/- रुपयांचा माल मिळाल्याने तो जागीच जप्त करण्यात आला, आरोपी 1) रंजीत उर्फ काल्या देशराज लोंगबरसे , वय 40 वर्ष रा. फुलफैलं , वर्धा. व 2) शेख असलम शेख रफिक वय 32 वर्ष राहणार बोरगाव मेघे वर्धा यांना गांजा बाबत विचारणा केली असता त्यांनी आरोपी 3) राम खरा रा. पाडवा जिल्हा कोरापुठ, राज्य ओडिसा (पसार) याचे कडून पाडवा राज्य ओडिसा येथे जाऊन तेथून गांजा विकत घेऊन तो घरी वर्धा येथे आणला अशी माहिती दिली आरोपी हे वरील प्रमाणे गांजा आमली पदार्थ बाळगून मिळुन आल्याने शासकीय पंचा समक्ष पंचनामा प्रमाणे 1) एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 10 किलो वजनाचा गांजा (अमली पदार्थ) प्रती 20,000 कीलो प्रमाणे किंमत 2,00,000/- रुपये. चा माल.(2) दोन अँड्रॉइड मोबाईल किंमत 20000 हजार रुपये असा जूमला किंमत 2,20,000 हजार रुपयांचा माल जप्त करून सदर आरोपी 1) रंजीत उर्फ काल्या देशराज लोंगबरसे , वय 40 वर्ष रा. फुलफैलं , वर्धा. 2) शेख असलम शेख रफिक वय 32 वर्ष राहणार बोरगाव मेघे वर्धा. 3) राम खरा रा. पाडवा जिल्हा कोरापुठ, राज्य ओडिसा (पसार) विरुद्ध पो. स्टे. वर्धा शहर येथे कलम 8(C),20(B),(2)(b),29 NDPS ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद केला. सदर आरोपी 1) रंजीत उर्फ काल्या देशराज लोंगबरसे , वय 40 वर्ष रा. फुलफैलं , वर्धा व 2) शेख असलम शेख रफिक वय 32 वर्ष राहणार बोरगाव मेघे वर्धा यांना रितसर गुन्ह्यांत अटक करण्यात आले आहे.

सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड सर, पोलीस निरीक्षक श्री कैलास पुंडकर यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी बालाजी लालपालवाले, पो.हवा. गजानन लामसे, यशवंत गोल्हर, दिनेश बोथकर, राजेन्द्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, गोपाल बावनकर, यांनी केली सदर कार्रवाई बाबत माननीय पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा टीम वर्धा यांना ₹25,000 बक्षीस जाहिर केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये