गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर पोलीसांकडून गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम

एकूण 2 लाख 63 हजारावर मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्ह्याची हकित याप्रमाणे आहे कि, आज दि. 29/07/2023 रोजी मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून आम्ही स.पो.नी एस.बी. शेगांवकर सोबत स.फौ./377 विक्की मस्के, पो.हवा./261 अरविंद येनुरकर, पो.ना./1245 रवि पुरोहित, पो.ना./299 राजेश शेंडे, पो.शि./1626 वैभव चरडे यांनी मौजा गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यामागील असलेल्या पडीत झुडपी शिवारात मोहा दारूच्या 04 रनिंग भट्टीवर कार्यवाही करण्यात आली. कार्यवाही दरम्यान एकुण. 4,350 ली. मोहा सडवा, 140 ली. मोहा दारू, 04 जर्मन घमेले व भट्टी साहित्य असा. जु.कि. 2,63,600 रू. चा मुद्देमाल मिळून आला असून, सदरच्या भट्या वरील नमुद आरोपीतांच्या मालकिच्या असून, ते मोक्कावर रंगेहाथ हजर मिळून आल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, सर्व आरोपीतांचे ताब्यातून 1) 71 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 4,350 ली. कच्चा व गरण मोहा सडवा रसायण, प्रति लीटर 50 रु प्रमाने 2,17,500 रु, व 71 ड्रम किं. 24,700 रू. 2) 04 प्लास्टीक कॅन व 02 डबकीमध्ये अंदाजे 140 ली गावठी मोहा दारू प्रती ली. 100 रू. प्रमाणे एकुण कि. 15,000 रू. 3) 04 जर्मन घमेले व भट्टी साहित्य किं. 6,400 रू. असा एकुण 2,63,600 रू. चा मुद्देमाल जु.किं. 2,63,600 रू. चा मुद्देमाल जप्त करून, जागीचं नाश करण्यात आला. सर्व आरोपी 1) दिनेश नवगण राउत, वय 36 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर 2) नरसुमा किरण राउत, वय 35 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर 3) बेबी रविन राउत, वय 35 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर, 4) विशाल विनायक पवार, वय 42 वर्ष, रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा, तह. समुद्रपूर विरूध्द पो.स्टे. समुद्रपूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (बी,सी,ई,एफ) अन्वये कार्यवाही करण्यात आली. .करीता सदरचा अहवाल माहितीस्तव सविनय सेवेशी सादर आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डाॅ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये