ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)च्या वर्धा जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी सतिश इंगळे यांची निवड!

शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सतिश इंगळे यांचे केले अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये व महा. प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा सुनिताताई चव्हाण आणि विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाने आंबेडकरी कार्यकर्ते सतिश इंगळे यांनी रिपाइं (आंबेडकर) मध्ये चेंबूर-मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रवेश घेतला.त्यावेळी त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वर्धा जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

दिनांक २७ जुलै २०२३ रोजी रिपाइं (ए) वर्धापन दिनी सतिश इंगळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.महा.प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिव राजेंद्र आठवले, कैलास मोरे, गिरीधर रौराळे,विदर्भ संघटक प्रबोधनकार संविधान मनोहरे, जिल्हा संघटक समाधान पाटील, जिल्हा सचिव सुभाष कांबळे, वर्धा तालुका अध्यक्ष सुनिल वणकर, मिलिंद तामगाडगे तसेच वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राजु थूल, जिल्हा युवा सचिव अंकीत रामटेके,रमेश जामलेकर,जयकांत पाटील,राष्ट्रपाल गणविर, प्रकाश कांबळे,प्रविण पोलके,किशोर फुसाटे,प्रविण कांबळे,आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सतिश इंगळे यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये