ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

माणूसकीचे दर्षन घडविणा-या नागरीकांचा पोलीस अधिक्षकांतर्फे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 27.07.2023 रोजी सोहम योगेष झिटे, वय 8 वर्शे, व रोहन उमेश बाहे वय 9 वर्शे दोन्ही राहणार सिंदी (रेल्वे), ता. सेलू, जि. वर्धा हे दुपारी 12.00 वाजताचे दरम्यान पालकांना मिळून आले नाहीत. त्यामूळे ते खेळता खेळता असे अचानक कूणालाही न सांगता कूठे निघून गेले असावेत म्हणून त्यांचे पालक व नातेवाईकांनी शोध घेतला परंतू कुठेही मिळून येत नव्हते.
गावात व एकूण जिल्हयातच पुरपरीस्थीती सदृष्य स्थीती, शाळांना सुट्टी त्यामूळे त्यांनी आपले मुलांना शोधण्याकरीता पोलीस स्टेशन सिंदीकडे धाव घेतली व आपल्या मुंलांचा शोध लवकरात लवकर लागावा याकरीता सोशल मिडीयावर सुध्दा त्यांचे फोटो व माहितीसह आर्त विनंती केली. मुलांच्या शोधाकरिता केलेली आर्त हाक हाहा म्हणता व्हायरल झाली.
त्यातच सदरची माहिती 1) श्री. धर्मपाल नावदेवराव मुन, रा. बरबडी (एम.आय.डी.सी.), ता.जि. वर्धा, 2) श्री. गजानन महादेवअप्पा कोठे, रा. बोबडे लेआऊट, पुलगांव, ता. देवळी जि. वर्धा व 3) श्री. पंकज महादेवराव चंदनखेडे, रा. पवनार, ता.जि. वर्धा यांना सुध्दा सोषल मिडीयाद्वारे मिळाली. क्रमांक 1 व 2 हे दररोजप्रमाणे आपल्या नोकरी व्यवसायासंबंधाने अपडाऊन दरम्यान पुलगाव रेल्वे स्थानकावर व क्रमांक 3 हे आपल्या खाजगी कामाने बाहेरगावावरून परत पूलगांव येथे संध्याकाळी 06.00 वा. चे दरम्यान पोहचले येत असता त्यांना 2 अल्पवयीन मूले रेल्वे स्थानकावर कोणत्याही पालकांषीवाय बसलेले आढळली व त्यांनी त्यांना जवळ घेवून विचारपूस केली व बारकाईने लक्ष दिले असता सदरची मूले सिंदी रेल्वे येथून हरविलेल्याबाबत सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या संदेषामधलीच असल्याची त्यांना खात्री पटली. लागलीच त्यांना सिंदी पोलीस स्टेशन व मुलांचे पालकांना फोनद्वारे माहिती दिली व पो.स्टे. सिंदी येथील पोलीसांना पुलगांव गाठले. मुले त्यांचे पालकांपर्यत सुखरूप पोहचली.
उपरोक्त तिघांनीही एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्या सामाजीक कर्तव्याची जाण ठेवून केलेल्या निस्वार्थ कार्यातून घडविलेले माणूसकीचे दर्षन इतर सामान्य नागरीकांनासुध्दा प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांचा उत्साह द्विगूणीत व्हावा व समाजामध्ये चांगल्या कार्याबाबत उत्तम संदेश जावा या हेतूने आज मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. नूरूल हसन साहेब यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये