ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी आंदोलक अक्षय लांजेवार यांची प्रकूर्ती खालावली..

उपजिल्हा रुग्णालयात केले भरती..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

     ओबीसींच्या न्यायिक मागंन्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाचया दुसऱ्या टप्प्यात सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सूकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आज दिनांक 12 डिसेंबरला उपोषणाच्या सहाव्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकुरती खालावली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

      चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात राज्य सरकारने आश्वासन देऊन सुधा मागण्या पूर्ण नाही केल्यामुळे चिमूर क्रांती भूमीतून अन्नत्याग आंदोलनाला 7 डिसेंबर पासून सुरुवात झाली. चिमूर येथील दोन युवक अजित सुकारे व अक्षय लांजेवार यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा सहावा दिवशी अक्षय लांजेवार यांची तब्बेत अचानक खालावली. वैदकिय अधिकारी डॉ. गायधनी यांनी अक्षय लांजेवार याना तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर,नामदेव किरसान, सूर्यकांत खनके, गजानन बूटके यांनी दवाखान्यात भेट दिली. उपोस्नाला सहा दिवस झाले असून सुधा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी की विरोधी पक्ष ओबीसींच्या न्यायिक मागण्याची दखल घेत नसल्याने ओबीसी समाजात तीव्र आक्रोश निर्माण होताना दिसत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये