ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खोकरी येथे शरदचंद्रजी पवार यांचे वाढदिवसानिमित्त वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५५ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी हजारोच्या संकेत गावकरी मंडळी उपस्थित होती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

               संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ५५ वी पुण्यतिथी व काकडा आरती रोप्य महोत्सव (चातुर्मास समाप्ती) 10. डिसेंबरला गुरुदेव सेवा मंडळ ग्रामपंचायत रंगमंच खोकरी येथे साजरा करण्यात आला.

         तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन, जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. आठ डिसेंबरला ला पहाटे ४ वा. ग्रामसफाई करून, सामुदायिक ध्यान, काकड आरती चिंतन, श्रमदान, तीर्थस्थापना, सामुदायिक प्रार्थना, रांगोळी स्पर्धा, ग्रामगीता वाचन स्पर्धा, जागृती भजन पार पडले. तसेच ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, रामधून, ग्रामगीता पाठांतर स्पर्धा, मौन श्रद्धांजली कार्यक्रम, जाहीर कीर्तन आणि जागृती भजन करण्यात आले.

       दि.10 ला ग्रामसफाई व सामुदायिक ध्यान करून, ८ वा. ढोल ताशांच्या निनादात भजन आणि देवाची वाणी गात भजन मंडळी राष्ट्रसंतांच्या पालखी समवेत गावातून रामधून (फेरी) काढण्यात आली. यावेळी, गावकऱ्यांनी, विशेष करून महिलांनी आपआपल्या घरासमोरील रस्ते स्वच्छ करून, विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या होत्या. गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील बालगोपालांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १२ वाजता गुरुदेव सेवा मंडळ खोकरी तर्फे भजन आणि अभंग गायन करण्यात आले. २ ते ४.पर्यंत ह.भ.प. र श्री पांडुरंग लांबट नंदुरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर गावातील गुरुदेव कार्यकारी मंडळाचे कार्यकर्ते तसेच इतर नागरिकांचे शाल, आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी भद्रावती तालुक्यातील चाळीसगावातील भजन मंडळींना शाल, श्रीफळसाडी, शील्ड, ढोलकी, व ग्रामगीता देऊन सत्कार करून, आयोजित करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी मुनाज शेख, सुरेंद्र वांढरे, डॉक्टर दातारकर, मारोतराव वांढरे, मुख्याध्यापक येटेराजेंद्र ताजने,, दिलीप डाख रे, बदकी महाराज, स्वप्निल पानतावणे, राजेंद्र ताजने, प्रवीण पेचे पंकज वांढरे, विलास नेरकर आदींची उपस्थिती होती गुरुदेव सेवा मंडळ खोकरी गावातर्फे सुधाकर रोहनकर यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला सरतेशेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मनोगताद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व काला आटोपून महाप्रसादाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाच्या या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावातील तरुण मंडळी, बालगोपाल, महिलावर्ग, वृद्ध तसेच हजारोच्या संकेत गावकरी मंडळी उपस्थित होती. या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये