Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नविन वर्षानिमीत्य साठवुन ठेवलेले विदेशी दारूचा माल वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी केले जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 30.12.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांना गोपनिय माहीती मिळाली की, नविन वर्षा निमीत्य नौशाद उर्फ अच्यु शॉह रा. वार्ड न. 4 इंदौरा नगर, आर्वी नाका वर्धा यांनी विदेशी दारूचा माल आणुन त्यांचे घरी साठवुन ठेवला आहे अशी माहीती मिळाताच उपविभगीय पोलीस अधिकारी यांचे पथक यांनी आरोपी नागे १) नौशाद उर्फ अच्दु रमजान शॉह वय 31 वर्षे रा.वार्ड न. 4 इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा यांचे घरी जावुन प्रोव्हीशन रेड केले असता मौक्यावर त्यांचे घरी त्याचे जवळ काम करणारा 2) रूपेश किसनराव नांदने वय 30 वर्षे रा. वार्ड न. 4 इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा हा मिळून आला व नौशाद यांचे घरझडतीतुन 1) एक खरडयाचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या रॉयल स्टैंग कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 48 सिलबंद शिश्या 2) 7 पेटी मध्ये 90 एम.एल.च्या टैंगो कंपनीच्या देशी दारू ने भरलेला 700 सिलबंद शिश्या 3) एक खरडयाचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस ब्लु कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 48 सिलबंद शिश्या 4) एक खरडयाचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 48 सिलबंद शिश्या 5) अर्ध्या खरडयाचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या बकार्डी ब्लॅक रम कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 22 सिलबंद शिश्या 6) एका प्लॉस्टीक चुगंडी मध्ये 750 एम.एल.च्या आफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 25 सिलबंद बंफर 7) एका प्लॉस्टीक चुगंडी मध्ये 375 एम.एल.च्या ओल्ड मंक रम कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 08 सिलबंद पांईट तसेच सदर विदेशी दारू आणण्या करीता वापरेले एक जुना वापरता तीन चाकी अॅटो क्र एम.एच. 32 बी 6154 व एक विवो कपंनीचा मोबाईल असा एकुन जु कि. 3,64,100/- रू चा माल मिळून आला. सदर विदेशी दारूचा माल कोठुन व कोणी दिला व कश्यानी आणला या बाबत विचारपुस केली असता आरोपी यांनी सांगीतले की सदर दारूचा माल हा मुकेश जयस्वाल रा. पुलगांव यांनी शांती नगर वर्षा यांनी आणुन दिला व तेथुन आरोपी यांनी विदेशी दारूच्या पेट्या त्यांचे जवळील तीन चाकी अॅटो क एम.एच., 32 बी 6154 मध्ये टाकुन घरी आणुन ठेवले असे सांगीतल्याने सदर विदेशी दारू मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.

पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपी नामे 1) नौशाद उर्फ अच्यु रमजान शॉह वय 31 वर्षे रा.वार्ड न. 4 इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा 2) रूपेश किसनराव नांदने वय 30 वर्षे रा. वार्ड न. इंदीरा नगर, आर्वी नाका दर्चा 3) मुकेश जयस्वाल रा. पुलगांव यांचे विरुध्द 1) अपराध क्रमांक 2024 कलम 65 ई., 77 अ. 83. म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्या, श्री. प्रमोद के, मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो. हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, सचिन भालशंकर व मुख्य युवा. कार्य. प्रशि योजना मधील चैतन्य धनविज यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये