विदर्भ महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक फेडरेशनची उद्याला अमरावती येथे बैठकीचे आयोजन
बैठकीत हिवाळी अधिवेशनावर ऑटोरिक्षा चालकांचा भव्य मोर्चाचे नियोजन
चांदा ब्लास्ट
विदर्भ महाराष्ट्र ऑटो चालक मालक फेडरेशनच्या वतीने अमरावती जिल्हयामध्ये विदर्भातील सर्व जिल्हाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सामुहिक बैठक बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२.०० वाजता स्थळ हरियाली लॉन, बडनेरा रोड, अमरावती नितिन मोहोड यांच्या लॉन येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीला चंद्रपूर जिल्हयातून संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हा अध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, संघटक प्रमुख विनोद चन्ने, महेश ढेकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी न चुकता उपस्थित राहावे. येत्या हिवाळी अधिवेशनावर ऑटोरिक्षा चालकांचा दि. ११.१२.२०२३ ला भव्य मोर्चा आयोजन केले असल्यामुळे त्याचे नियोजन करण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच राज्यातील ऑटोरिक्षा चालकांना कल्याणकारी बोर्ड स्थापित झाले आहे. त्याची अमलबजावणी लवकरत लवकर करावे. याकरिता नियोजन करण्यात येणार आहे.