ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धान उत्पादक शेतकरी संकटात ; उत्पादन कमी होण्याची शक्यता – गोंडवाना विदर्भ मुक्ती संघटना

राज्य सरकारने धानाचा हमीभाव कमीत कमी 2500 रुपये दिला पाहिजे अन्यथा आंदोलन

चांदा ब्लास्ट

दरवर्षीप्रमाणे यावर्षी अनियमीत पाऊस पडला काही भागात अतिशय पाऊस झाला आणि काही भागात अल्प प्रमाणात पाऊस पडला आमचे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि अत्यधीक पाउसामुळे पुर आल्याने धानाची फसल खराब झाली होती आणि काही ऐरियामध्ये करपा रोगचाही प्रादुर्भाव वाढला त्यामुळे यावर्षी धानाचा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे धान उत्पादक शेतकरी संकटात येऊ शकते आणि शेतकरी आत्महत्याचा प्रमाण वाढला आहे. हे दोनही जिल्हयामध्ये आकडेवारी बघतांना दिसून येत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी वर राज्य सरकारकडून ज्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे तसे मिळत नाही आहे आणि अनेक वर्षापासून दोनही जिल्हयाचे धान उत्पादक शेतकरी सिंचनासाठी वरुन पडणारे पाउसावर ही निर्भर आहे दोनही जिल्हयामध्ये जे सिंचन प्रकल्प राज्य सरकारने सुरु केले आहे ते प्रलंबीत आहे आणि त्यांचा फायदा दोनही जिल्हयाचे शेतकरी ला अल्प प्रमाणात होत आहे.

त्यामुळे धान उत्पादक शेतकरी खूप संकटात दिसून येत आहे. अश्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारनी धानाचा हमीभाव कमीत कमी 2500 रुपये प्रती क्विंटल करुन धान उत्पादक शेतकरी ला एक मोठी मदत राज्य सरकार च्या वतीने करण्या करीता एक दिलासा होईल विदर्भ च्या सिमातून लागलेले छत्तीसगड राज्यामध्ये 2500 रुपयचा हमीभाव धान उत्पादक शेतकरीला देणे सुरु आहे तसेच मध्यप्रदेश मध्ये 3100 रुपय प्रती क्विंटल चा हमीभाव मध्यप्रदेश सरकारने निवडणूकीचा पहिले देण्यात येईल अशी घोषणा केलेली होती महाराष्ट्रामध्ये विजेचे दर इतर राज्यापेक्षा जास्त आहे आणि फसल चा हमीभाव इतर राज्यापेक्षा खूप कमी आहे.

सदर परिस्थिती लक्षात घेउन राज्य सरकारने धान उत्पादक शेतकरी चा संकट लक्षात घेऊन धानाचा हमीभाव कमीत कमी 2500 रुपये दिला पाहिजे अन्यथा आमच्या मार्फत आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचा पत्र मान. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे आणि मागणी करण्यात आलेली आहे कि धानाचा हमीभाव कमीत कमी यावर्षी 2500 रुपये करण्यात यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये