अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम नागपूर येथे आयोजित
संपूर्ण देशातील ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठरणार मार्गदर्शक

चांदा ब्लास्ट
रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम*देवी अहिल्या मंदिर सभागृह, धंतोली, नागपूर येथे सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळात आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष, अँड नारायण भाई शहा, संघटन मंत्री दिनकर सबनीस, स्वर्ण जयंती समारोहाचे अ.भा.सचिव तथा सहसचिव जयंती भाई काथिरिया उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटक म्हणून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व,कुलगुरू डॉ. वेद प्रकाश मिश्रा हे राहतील तसेच आर्थिक विषयावरील चिंतक, “अर्थक्रांती” चे अध्यक्ष, श्री अनिल बोकील यांचेही महत्वपूर्ण व्याख्यान आयोजित आहे. पाश्चिम क्षेत्र संघटक गजानन पांडे हेही कार्यक्रमात उपस्थित राहतील.
ग्राहक चळवळीच्या कार्याचे खरे बीजारोपण विदर्भाच्या भूमीत झाले आहे.त्यामुळे संपूर्ण देशातील ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.
सुवर्णजयंती उद्घाटन समारंभ कार्यक्रमानिमित्त ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.सदर कार्याक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष नंदिनी चुनारकर, संघटनमंत्री वसंत वऱ्हाटे, सचिव प्रभात कुमार तन्नीरवार, मार्गदर्शक पुरूषोत्तम मत्ते, संगिता लोखंडे, प्रविण चिमूरकर,आणय्याजी ढवस, जितेंद्र चोरडिया, मधुसूदन भूमकर,राम चिचपाले,वामन नामपल्लीवार,आशिष कोटकर, सदानंद आगबत्तनवार, भाग्यश्री भूमकर, सुनील वनकर, डॉ.सोमेश्वर झुरे, पत्रु बक्षी, शंकर पाल आदींनी केले आहे.