महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नगराध्यक्षासह नव निर्वाचित सदस्यांचा सत्कार
शिव पार्वती बहुउद्देशीय विकास संस्था गवराळाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ येथील अध्यक्ष, राजेश व कल्पना मोगरे संचालित शिव पार्वती बहुउद्देशीय विकास संस्था भद्रावती तर्फे तसेच कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १५ रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल चटकी व जेष्ठ नगरसेविका तथा सभापती सौ.रेखा खुटेमाटे व प्रभाग क्रमांक १४ चे स्वीकृत तज्ञ नगरसेवक राजेश बदखल, प्रथम संदेश गेडाम, व सौ.कविता मधुकर सावनकर या सदस्यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला.
शिवपार्वती बहुउद्देशीय विकास संस्थेच्या संचालकतर्फ सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
स्वच्छतेच्या बाबतीत विशेष अभियान राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणाऱ्या कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती चा हि समायोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष मंगेश येरमे यांनी सत्काराचा स्वीकार केला.
व्यासपीठावर नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांसह जेष्ठ नागरिक शामराव खापणे, स्टेशन मास्टर प्रमोद तांडी ,युवा नेतृत्व विलास डोये हिरा मुलींचे वसतिगृह संचालिका आदी आवर्जून उपस्थित होते.
मोगरे परिवार व शिवपार्वती बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या कार्याचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
सत्कारा स उत्तर देताना नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी दुर्लक्षित अश्या प्रभाग क्रमांक १४ च्या मूलभूत विकासाकरिता विशेष महत्त्व देण्यात येईल तसेच स्वच्छता समितीच्या कार्यास अध्यक्ष या नात्याने माझे पूर्ण पाठबळ राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ नगरसेविका तथा सभापती न.प.भद्रावती सौ. रेखा कुटेमाटे यांनी प्रभाग विकासाबाबत सभापती म्हणून सर्वोत्तपरी योगदान देऊ असे सांगून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
सत्कारास उत्तर देताना स्वीकृत नगरसेवक राजेश बदखल, प्रथम गेडाम, सौ. कविता सावनकर यांनी आम्ही ज्येष्ठांचा सन्मान ठेऊन त्यांच्या व वॉर्ड वासियांच्या अपेक्षेस निश्चतच पात्र ठरू अशी विकासात्मक कामे करू असे सांगितले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती संघटक तथा पत्रकार लिमेश माणूसमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद तांडी यांनी केले.
हिरा वसतिगृहाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले . कार्यक्रम यशस्वी करण्यात मंगल राऊत, मंदा नागोसे,झंनकलाल चौधरी, कुसुम बोधे, नंदकिशोर राऊत, आदी सह कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती सदस्यांनी विशेष योगदान दिले.



