ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सागरा येथे श्री गुरूदेव सेवा मंडळाचा आदर्श उपक्रम

युवकांचा स्वच्छतेचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने सागरा श्री गुरुदेव सेवा मंडळ सागराच्या युवा कार्यकारिणीने स्वच्छता अभियान राबवून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवला. “ग्राम सुधारणेचा मूलमंत्र! सज्जनांनी यावे एकत्र! संघटना हेची शक्तीचे सूत्र! ग्राम राज्य निर्माण करी!!” या ओवीतील संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत रविवारी सामुदायिक प्रार्थना मंदिर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नवीन युवा पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर व व्यवस्थित केला. या उपक्रमात कार्याध्यक्ष प्रेमदास जगन्नाथ वागदरकर, अध्यक्ष प्रवीण दिलीप वागदरकर, उपाध्यक्ष सुनील मारोती उज्वलकर, सचिव प्रफुल तीकाराम येवले, सहसचिव मारोती बापूराव बांदुरकर, कोषाध्यक्ष हनुमान भाऊराव रासेकर, सल्लागार विनोद महादेव बांदुरकर तसेच सदस्य महादेव मारोती मांडवकर, चंपत यादव सरोदे, प्रदीप देविदास बदखल, बबन राघोजी नौकरकार, रसिका गजानन मारेकर, सोनाली कैलास पेंदोर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या सामाजिक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून तसेच विविध समाज माध्यमांतून कौतुक होत असून, गावागावातील गुरुदेव सेवा मंडळांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी कार्यकारिणीतील युवकांचे कौतुक करत, ग्रामसेवेचे असेच सातत्यपूर्ण कार्य सुरू ठेवून सागरा गावाला आदर्श गाव बनवण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये