ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालकांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन ऊर्जा व प्रेरणा मिळेल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक क्षेत्र भेट सहलीचा शुभेच्छा ; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 44 विद्यार्थी इसरोला रवाना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

इसरो आणि कुप्पम येथील भेटीमुळे बालकांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन ऊर्जा व प्रेरणा मिळेल. भविष्यात विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी तसेच एआय सारख्या प्रगत विज्ञानाला समजून घेण्यास मदत होईल. बाल वैज्ञानिकांनी या भेटीचे सोने करुन आपल्या जिल्ह्यासोबतच देशाचे नाव लौकिक करावे, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्याच्यावतीने जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी बंगलोर येथील इसरो व आंध्रपदेश येथील कुप्पम येथे शैक्षणिक क्षेत्र भेट सहल आयोजित करण्यात आली आहे. सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा देऊन त्यांना बंगलोर कडे रवाना केले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याच संकल्पनेतून ही सहल आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.मंगेश घोगरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, वरिष्ठ व्याख्याता संजय नवले, उपशिक्षणाधिकारी रुपेश काबंळे आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाला व देशाला विज्ञानाचे महत्व पटवून दिले असून त्याची अंमलबजावणी करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी, भविष्यात आजच्या बाल वैज्ञानिकांनी जगात नावलौकिक करावे, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ही शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनीतील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्था यैथे सहलीला नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मंजूरी प्राप्त होताच नासा येथे विद्यार्थ्यांना सहलीला नेणार असल्याचे यावेळी डॉ.पंकज भोयर म्हणाले.

जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन संशोधक व्हावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्यात.

*पालकमंत्र्याचे पालकांना आवाहन*

सहलील जाणाऱ्या बालकांच्या पालकांनी आपल्या बालकांची काळजी करु नये, गृह राज्यमंत्री या नात्याने मुलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी पालकांना आश्वस्त केले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातून 44 विद्यार्थ्यांना खाजगी बसद्वारे नागपूरकडे रवाना करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवून सहलीचा शुभारंभ करण्यात आला. नागपूर येथून सायंकाळी 7 वाजताच्या विमानाने संपूर्ण 44 विद्यार्थी बंगलोरकडे रवाना होणार आहे. विद्यार्थ्यांसोबत तीन प्राद्यापक, विस्तार अधिकारी व एक डॉक्टर सोबत आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली असल्याचे डॉ.मंगेश घोगरे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये