जिवती येथे २६ नोव्हेंबरला निशुल्क महाआरोग्य शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
आमदार सुभाष धोटे मित्र परिवार आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने जिवती येथे २६ नोव्हेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या भव्य निशुल्क आरोग्य शिबीराच्या तयारीचा आढावा आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती, जिवती येथे घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण सुचना केल्या. तसेच जिवती तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉ. एन पी शिंगणे, डॉ. मुर्लीधर उमाटे, जिवती चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे, तसेच भारी, पाटण, शेनगाव, जिवती येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, गणपत आडे, भीमराव मडावी, सुग्रीव गोतावळे, अभिजीत धोटे, नंदाताई मुसने, अशपाक शेख, सिताराम मडावी, माधव डोईफोडे, अजगर शेख, बंडू राठोड, दत्ता गायकवाड, तिरुपती पोले, दत्ता तोगरे, बालाजी गोटमवाड, ताजुद्दीन शेख, नारायण वाघमारे, उत्तम कराळे, मारोती मोरे, बाळु पतंगे, दत्ता गिरी, सुनील शेळके, विष्णू रेड्डी, सुरेश कोडापे, जब्बारभाई शेख सत्तरशहा कोटनाके, दिवाकर वेट्टी, आशिष डासाने यासह अनेकांची उपस्थिती होती.