Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

शहीद शेडमाके, क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मृती जागविण्यासाठी गोंडीयन आदिवासी कृती समितीतर्फे भव्य रॅलीचे आयोजन

चांदा ब्लास्ट :*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : आदिवासी महापुरुषांनी समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी दिलेला लढा, संघर्ष, त्याग याची जाणीव सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच आदिवासी समाजासमोरील आव्हाने, वर्तमान स्थिती, लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती,

समाजाचे विविध प्रश्न यावर सकारात्मक उहापोह होण्यासाठी शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६६ व्या शहीद दिन आणि क्रांतिवीर धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जागविण्याच्या दुहेरी हेतूने १५ नोव्हेंबरला वरोरा येथे गोंडीयन आदिवासी कृती समितीतर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मालवीय वार्ड व कॉलरी वार्डातून रॅली काढण्यात येणार असून दोन्ही रॅली राणी दुर्गावती चौकात विलीन होणार आहे.
रॅलीचे उद्घाटन ज.गो.गं. पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरद मडावी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून शहराच्या विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते रॅलीचे स्वागत करण्यात येईल.
आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष स्वप्नील येटे, कार्याध्यक्ष अनिल कुमरे, सचिव मनोज पेंदोर, उपाध्यक्ष संभा मेश्राम, डॉ. अविनाश पंधरे, गणपत येटे, ज्ञानेश्वर मेश्राम, नागोजी सिडाम, जगदीश पंधरे, प्रफुल्ल किन्नाके, अभय मडावी, शंकर कुळसंगे, विलास परचाके, राजा गावंडे, उद्धव गेडाम, रमेश मडावी इ.नी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये