Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्थ कंजर्वेशन ऑर्गनायझेशन संस्थे तर्फे दोन अजगरांना जीवनदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

दिनांक ११ नोव्हेंबर रोजी ब्रम्हपुरी जवळ असलेल्या माहेर गावालगतच्या शेतात धान कापणी करतांना काही महिलांना अजगर आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली.गावकऱ्यांनी या घटनेची माहिती संस्थेचे अध्यक्ष मनोज वठे यांना दिली घटनेचे माहिती मिळताच सर्पमित्र मनोज वठे, श्रीगणेश बुराडे,चेतन राखडे,अक्षय कुथे यांनी घटनास्थळी पोहचून अजगराला सुरक्षित केले.

अगदी काही वेळातच ब्रम्हपुरी शहरालगत असलेल्या मालडोंगरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्या लगतच्या शेतात धानकापणी करताना पुन्हा साप असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहचताच अंदाजे ७ फुटाचा अजगर आढळुन आला.सर्पमित्र चेतन राखडे,ज्ञानेश्वर दिवटे,शिवशंकर नाकाडे यांनी अजगराला सुरक्षित रित्या पकडले.

दोन्ही अजगरांना वन परिक्षेत्र अधिकारी  एस. नरड व संस्थेचे अध्यक्ष मनोज वठे यांच्या मार्गदर्शनात जंगलात सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आले. या प्रसंगी वनरक्षक जी. कांगणे, टी सोनुले, मंगेश मोटघरे, व अर्थ कंजर्वेशन संस्थेच्या वतीने प्रफुल गभने,मयूर ठाकरे,ललित उरकुडे,भूपेश राखडे,ईशान वठे ई.उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये