ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका सौ स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,पर्यवेक्षक शंकर तुराणकर होते.
सर्वप्रथम पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत धाबेकर यांनी केले.याप्रसंगी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.