ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहीद अशफाकुल्लाह खान हे राष्ट्रीय एकात्मिकतेचे जिवंत उदाहरण -डॉ दिलीप चौधरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे शहीद अशफाकुल्लाह खान यांच्या जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबर ला अलहुदा हॉल बल्लारपूर येथे, शहीद अशफाकुल्लाह मेमोरियल मल्टिपरपस सोसायटी च्या वतीने समाजच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व सामाजिक सलोख्यासाठी योगदान देणाऱ्या 9 व्या राष्ट्रीय सदभावना व समाज भूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात सौ.पुष्पा पोडे पाचभाई, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नर्सिंग पाठ्य निर्देशीका चंद्रपूर, श्री युनूस शेख, अध्यक्ष् निराश्रीत निराधार लोकसेवा प्रकल्प सिंदेवाही, डॉ ऍड. अंजली साळवे, माजी समुपदेशक राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली, श्री धनंजय शास्त्रकार ,समाजसेवक व रक्त दाता चंद्रपूर यांना राष्ट्रीय सदभावना पुरस्कार देण्यात आले.

तसेच स्नेहल चौधरी कदम ,अध्यक्ष क्षितिज सामाजिक संस्था वाशीम, श्रीमती सहारा शेख ,आत्मनिर्भर समाज सेविका मूल, कु सदफ नफिस अन्सारी ,राष्ट्रपती द्वारा पुरस्कृत विध्यार्थी बल्लारपूर, अहमद रझा इस्माईल ढाकवाला, राष्ट्रीय स्वर्णपदक प्राप्त वेटलिफ्टर बल्लारपूर यांना समाजभूषण पुरस्कार ने गौरविण्यात आले.कार्यक्रमात कवीवर्य नरेंद्र वानखेडे यांच्या काव्यसंग्रहाचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी प्रा. डॉ दिलीप चौधरी, सेनट सदस्य व अध्यक्ष् संभाजी ब्रिगेड जिल्हा चंद्रपूर यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली, कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोहम्मद सलमान सर,यांनी केले.प्रा स्ताविक शहीद अशफाकुल्लाहस मितीचे अध्यक्ष श्री हाजी मोहम्मद शरीफ गुरुजी यांनी व आभार प्रदर्शन श्री झहीर सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये