ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विघ्नकर्त्यांच्या फलकामुळे चक्क विघ्नहर्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात

वरद विनायक प्रवेशद्वार जवळील अष्टविनायक प्रतिमा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती शहराला प्राचिन असा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याने वाकाटक कालीन, यादवकालीन, हेमाडपंथी मंदिरे, तद्वतच गोंडकालीन राजवटीचा इतिहास सांगणारा किल्ला, शहराच्या सभोवताल तलावांची संख्या, जैन धर्मियांचे प्रसिद्ध पार्श्वनाथ मंदिर, भद्रनाग स्वामी मंदिर, बौद्ध धर्मियांचे बौद्ध लेणी, तद्वतच हिंदू धर्मियांचे अनेक श्रद्धास्थाने या शहराची ओळख असल्याने अनेक पर्यटक व भाविकांच आवागमन या शहरात होत असते.

भद्रावती नगर परिषदेने प्राचिन वैभव टिकविण्यासाठी आणि या प्राचिन वैभवाच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी लाखो रुपये खर्चून भद्रनाग मंदिर परिसरात, तसेच प्रभाग क्रमांक १४ मध्ये आकर्षक प्रवेश द्वार व लगतच बौद्ध व हिंदू धर्मिय सन्मानार्थ आकर्षक मूर्ती देखावे लावले आहेत. त्यापैकी गवराळा येथील वरद विनायक मंदिर प्रवेशद्वारा लगत गणेशाचा महिमा प्रगट करणारे अष्टविनायक प्रतिमा बसविण्यात आल्या मात्र चक्क या देखाव्यासमोरच जाहिरात फलक, दिशादर्शक फलक लावण्यात येत असल्याने अष्टविनायक प्रतिमा पूर्णतः झाकल्या गेल्याने गणेश भक्तांच्या श्रद्धेला ठेच पोहोचत आहे.

नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी विराजमान होताच भद्रावती शहरातील देखावे व पुतळ्यांच्या दुरुस्ती, व रंगरंगोटीवर विशेष लक्ष केंद्रित केले मात्र गवराळा येथील या प्रतिमा दुर्लक्षित राहिल्या.

 अष्टविनायक हे अवघ्या देशाच आराध्य दैवत आहे. अतिक्रमण व चमकोगिरी करणाऱ्यांचे फलक यामुळे या प्रतिमांचे अक्षरशः विडंबन होत असल्याने स्थानिक प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन अतिक्रमणाच्या विळख्यातील अष्टविनायक प्रतिमांची सोडवणूक करावी व या प्रतिमांच्या सौंदर्यात भर घालावी अशी मागणी भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये