ताज्या घडामोडी

वरोऱ्यात पांढऱ्या सोन्याला ७२५४ ₹ चा भाव

रविकमल कॉटेक्स येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट :राजेंद्र मर्दाने

 

*वरोरा* : तालुक्यातील रविकमल कॉटेक्स, कापूस व धान्य खरेदी केंद्र, मार्डा रोड, मौजा वनोजा येथे दिवाळी पूर्व कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेमुर्डे यांच्या हस्ते नव्या हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. शुभारंभाच्या मुहूर्तावर ७२५४ रुपये प्रतिक्विंटल या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला.


तालुक्यातील मुख्य पिक कापूस व सोयाबीन. वरोरा तालुक्यात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४२२० हेक्टर. पांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध असलेल्या कापसाकडे शेतकरी नगदी पिक म्हणून पाहतात. त्यामुळे खरीप हंगामात बहुत शेतकऱ्यांनी यंदा शेतात कपाशीचा पेरा वाढवला. नव्या हंगामातील कापूस वेचणीला सुरुवात झाली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीला काढला आहे .
रविकमल कोटेक्स मार्डा येथे नुकताच कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रविकमल कॉटेक्सचे मालक संदेश चोरडिया, बाळू भोयर,
गणेश चवले, अभिजीत पावडे, दत्ता बोरेकर, विलास झिले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सचिन डहाळकर, किशोर महाजन, कैलास बनसोड, पंकज डवरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, पाहुण्यांच्या हस्ते अरुण खोडे (वरोरा), सुनील गायकवाड (आष्टी), अमोल दातारकर (शेगाव) ,अरविंद आसुटकर (पिरली) ,राहुल दातारकर (वाघेडा) पहिल्यांदा आलेल्या या कापूस उत्पादक शेतकऱ्याचे स्वागत करण्यात आले व चालू हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

*कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल*
– *संदेश चोरडिया*

शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक न करता शेतमालाला योग्य भाव मिळत असल्याने मागील अनेक वर्षांपासून रविकमल कॉंटेक्स, कापूस व धान्य खरेदी केंद्राच्या माध्यमातून एक विश्वसनीय केंद्र म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. नव्या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या, कास्तकारांच्या मालाला योग्य भाव देण्यात येईल, असे मत रविकमल कॉटेक्सचे मालक संदेश चोरडिया यांनी व्यक्त केले. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशात ३ कोटी २५ लाख कापसाच्या गाठीचे उत्पन्न झाले होते. यावर्षी देशात कापसाचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्याने कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे संदेश चोरडिया यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये