ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वनविभागाने दोन ते अडीच वर्षे वयोगटातील वाघिणीला केले जेरबंद

तीन घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांना गमवावा लागला जीव

चांदा ब्लास्ट

ब्रह्मपुरी अंतर्गत दक्षिण ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रातील आवळगाव उपप्रदेशातील हळदा बिट, खोली क्र. ११६८ मध्ये रविवार ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वनविभागाने दोन ते अडीच वर्षे वयोगटातील वाघिणीला जेरबंद केले.

गेल्या आठवड्यात लागोपाठ तीन घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागल्याची माहिती आहे.

तेव्हापासून ब्रह्मपुरी वनविभागाचे वन कर्मचारी या वाघिणीला पकडण्यासाठी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

दुपारी चार वाजता या वाघिणीच्या स्थळाची माहिती मिळताच डॉ.आर. एस. खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी. व्याघ्र प्रकल्प आणि आर.आर.टी मराठा, पोलीस नाईक, (शूटर) ताडोबा अंधारी. व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, राकेश आहुजा, जीवशास्त्रज्ञ, वनविभाग ब्रम्हपुरी, या पथकाने तिला शांत करून पकडले. त्यानंतर वाघिणीला चंद्रपूर ट्रान्झिट सेंटरमध्ये हस्तांतरित करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये