ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प. शाळा लालगुडा येथील विद्यार्थ्यांनी केला प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना पंचायत समिती अंतर्गत गडचांदुर केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा लालगुडा येथील विद्यार्थ्यांनी यंदा प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

           पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. भारतीय परंपरेतील सर्व सण व उत्सव यांचं निसर्गाशी अतूट नातं आहे. सर्वसामान्य नागरिकांना निरोगी व प्रदूषण मुक्त वातावरणात जगण्यासाठी, कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि दिवाळीत फटाक्यामुळे ध्वनीचे तथा वायूचे प्रदूषण होणार नाही., यामुळे आम्ही कोणीही फटाके फोडणार नसल्याची सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली.

            यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा दिली. तसेच विद्यार्थ्यांकडून आकर्षक व टिकाऊ कागदापासून पर्यावरण पूरक आकाश कंदील आणि माती पासून विविध आकाराच्या आकर्षक पणत्या बनवून घेण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये