ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष मोहीम अंतर्गत अवैद्य गावठी मोहा दारूच्या अड्ड्यावर पोलीसांची धडक कारवाई

लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त ; पो.स्टे. सावंगी मेघे, पोलीसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक ०१/०३/२०२६ रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे, जि. वर्धा पोलीसांनी अवैद्य दारू विकी आणि निर्मीती करणाऱ्या गुन्हेगारांविरूद्ध धडक मोहीम राबवीली. या विशेष मोहीमेअंतर्गत, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या पारधी बेडा, पांढरकवडा आणि शिखबेडा, सावंगी मेघे येथे पोलीसांची पथके तयार करून अनेक गावठी मोहा दारूच्या भट्टयांवर छापे टाकण्यात आले.

या कारवाईत पोलीसांनी लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन यामध्ये तयार केलेली गावठी मोहा दारू, हजारो लिटर कच्चा मोहा सडवा आणि दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे रसायन, भांडी आणि ईतर साहीत्य असा एकूण १८,५६,२००रू. मुद्येमाल जप्त करण्यात आला असुन सी.ए. परिक्षणाकरिता सॅम्पल वेगळे काढुन उर्वरित मुद्येमाल नष्ट करण्यात आलेला आहे. सदर कारवाई मध्ये एकूण ०७ आरोपीविरूद्ध ०७ गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींची नावे ०१. विक्रमसिंग ठाकुरसिंग भादा वय ६२ वर्ष रा. शिखबेडा, सावंगी मेघे, ता.जि. वर्धा ०२. कमलाकौर भरतसिंग भादा वय वर्ष रा. शिखबेडा, सावंगी मेघे, ता.जि. वर्धा ०३. राजगिरसिइंग सिंग खिच्ची रा. शिखबेडा, ता. जि. वर्धा ०४. सुंदरकौर बावरी रा. शिखबेडा ता.जि. वर्धा ०५. चंद्रशिला दिपक पवार रा. पांढरकवडा, ता.जि. वर्धा ०६. सूनिता भोसले रा. पांढरकवडा, ०७. आमोद काळे रा. पांढरकवडा, ता.जि. वर्धा अशी असुन या कारवाईमुळे आरोपीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या कारवाईमुळे अवैद्य दारू निर्मीती करणाऱ्या आणि समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवणाऱ्यावर मोठा वचक बसला आहे. या संदर्भात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. सौरभकूमार अग्रवाल सा., पोलीस अधीक्षक जि. वर्धा. मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., अप्पर पोलीस अधिक्षक, जि. वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वर्धा यांचे मार्गदर्शनात सपोनी. पंकज वाघोडे ठाणेदार पो.स्टे. सावंगी जि. वर्धा, पो.उपनि. गोपाल शिंदे, पोउपनि. डोणेकर, पोउपनि सतिश दुधाणे पो.हवा. अमोल खाडे ब.नं ७५४, ना.पो.शि. सजय पटले बन. १४९५, पोशी हर्षवर्धन मुन ब.नं. ११०३, पोहवा संजय पंचभाई, ६५६, पो.शि. निखील फुटाणे ब.नं. १५३२, पोहवा. अभय खोब्रागडे २७४, पोहवा. चंदू सोनोने ब.नं. ९१०, पो.शि. अमोल जाधव ब.नं. २७२, पोशी श्याम सलामे, पो.शि. वैभव जगणे ब.नं. १५५५, पोशी अक्षय हिवरे ब.नं. ६७७पोशी गौरव नरताम ६८१, व होमगार्ड सैनिक यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये