महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्समध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी असे तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ प्रगती नरखेडकर, अधिष्ठाता आंतरविद्यशाखा विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मा. श्री विठ्ठलराव थिपे उपाध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर, प्रा. विशाल मालेकर प्रभाकरराव मामुलकर कला महाविद्यालय कोरपना तसेच तरुण वकील ॲड. दीपक चटप, महाविद्यालयाचे IQAC चे समन्वयक डॉ उत्कर्ष मुन हे उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव यांनी तर कार्यक्रमाचा अहवाल व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा यांनी मानले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ मनोहर बांद्रे यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.



