ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू, गांजा विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमावर कार्यवाही

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाने पोस्टे परिसरात होणाऱ्या होळी सण उत्सव संबंधाने दारू, गांजा विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमावर कार्यवाही करणे बाबत आदेशित केले असता व सदर कार्यवाही संबंधाने गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 01 हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मूखबीर कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, एक इसम त्याचे ताब्यातील दुचाकी मोपेड वाहनाने नागरी रोडनी हिंगणघाट कडे दारुचा माल घेऊन वाहतूक करीत आहे.

अशा खात्रीशीर खबरे वरून सदर माहीती पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत यांना देवून त्याचे मार्गदर्शनात पंच व पोस्टाँप सह सरकारी दवाखाना रोडणी नाकेबंदी करीत असताना माहितीप्रमाणे एक मोपेड वाहन येताना दिसल्याने पो. स्टॉप चे मदतीने नाकेबंदी करून थांबवून पंचांसमक्ष मोपेड चालक या विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुजल विनोद कडू वय 18 वर्ष राहणार तहसील वॉर्ड हिंगणघाट ता.हिंगणघाट यांचे ताब्यातून एक चुंगडीत1) प्रीमियम कंपनीच्या देशी दारू ने भरलेल्या 150 प्लास्टिक शिशा दारू किंमत 15,000रू, 2) डेस्टिनी प्राईम कंपनीची मोपेड क्र MH 32 AW 2465 कीं 70,000रू असा एकूण जुमला किंमत 85,000रू चा माल बिना पास परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस ठाणे हिंगणघाट येथे कलम 65(अ )(ई ),77(A)दारूबंदी कायदा सहकलंम3(1),181,130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत सोनू उर्फ प्रवीण ज्ञानेश्वर भांगे वय 33 वर्ष राहणार डांगरी वॉर्ड हिंगणघाट याच्या घरझडतीत दोन लिटरचे रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारू ने भरलेले पाच बंपर किंमत 15,000/रु चा दारुमाल तसेच तिसऱ्या कारवाईत संत चोखोबा वॉर्ड येथील राहणारा ओम सुपारे याच्यावर कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या रॉकेट कंपनीच्या 30 शिषा की.3000/रु दारुमाल जप्त करण्यात आला.तिन्ही कार्यवाही दरम्यान जुमला किंमत 1,03,000/रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींता विरुद्ध कारवाई करण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल सा, मा.अप्पर पोलीस अधीक्षक,सदाशिव वाघमारे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व मा., पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, रोहित साठे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये