ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफडे
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे,होत्या प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक भिमस्वरूप हस्ते, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थीत होते.सर्वप्रथम महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वामन टेकाम यांनी महर्षी वाल्मिकी यांनी मनोगत व्यक्त केले संचालन व आभार प्रदर्शन देवराव जाधव यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,उपस्थित होते.