ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईला रवाना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

महाराष्ट्रात दरवर्षी शिवसेनेतर्फे दसरा मेळावा साजरा केला जातो. यावर्षी एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचा भव्य मेळावा आझाद मैदान मुंबई येथे होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व बंडू हजारे यांच्या नेतृत्वात २० बसेस मध्ये जवळपास 800 शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
पूर्व विदर्भ संघटन किरन पांडव यांच्या नेतृत्व जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर राहणार असून या सर्व लोकांची व्यवस्था काळजीपूर्वक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुखांनी दिली आहे.

त्यामुळे गावागावातून शिवसैनिकांनी होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात हजरी लावणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये