ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅव्हलच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

निंबाळा फाट्यावरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

एका खाजगी ट्रॅव्हल बसणे दुचाकी स्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक 31 वर्षे युवक गंभीर जखमी झाला. सदर घटना दिनांक 23 रोज सोमवारला भद्रावती शहराजवळील हायवे वरील निंबाळा फाट्याजवळ दुपारी साडेअकराच्या दरम्यान घडली. सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली नसल्यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव कळू शकले नाही.

तक्रार करण्यात आली नसल्याने भद्रावती पोलिसांनी अपघाताची केवळ नोंद केली असल्याचे पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले. सदर युवक हा भद्रावतीकडून घोरपेड गावाकडे जात असताना त्याला एका खाजगी ट्रॅव्हलने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये