कर्नाटक एम्टा कंपनी प्रशासनाला शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी शिकवला शिवसेना स्टाईल धडा
मृतक कामगाराच्या परिवारास 25 लाख देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील कर्नाटक एम्टा कंपनीतील केपीसीएल याठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगार जितेंद्र रामअवतार कर्णधार वय 36 वर्ष या कामगाराचा मृत्यू झाला.
मात्र कंपनी प्रशासन मृत्कांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ करत असल्याने मृतकांच्या कुटुंबीयांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्याशी संपर्क केला असता जिल्हाप्रमुख यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालय भद्रावती गाठत मृतकांच्या कुटुंबाची भेट घेतली व मुजोर कंपनी प्रशासनाला चांगलाच धडा शिकवला. सदर कंपनी प्रशासनातर्फे कुठलाही कामगारांचे इपीएफ व इएसआसी भरण्यात येत नाही.
नियमबाह्य काम करणाऱ्या कंपनी प्रशासनाने सदर मृतक कामगाराच्या परिवारास 25 लाख रुपये देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केली आहे.अन्यथा शिवसेना तर्फे कंपनी बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.