गडचांदूर येथे महात्मा गांधी अभ्यासिकेचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्त महात्मा गांधी अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. धनंजय गोरे, उपाध्यक्ष श्री. विठ्ठलराव थीपे, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ स्मिता चिताडे होत्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव उपस्थित होते. या महात्मा गांधी अभ्यासिकेचे समन्वयक महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोहर बांदरे यांनी उदघाटन कार्यक्रमाचे संचालन केले.
सत्य, अहिंसा या तत्वावर जीवन जगणारे महात्मा गांधी कोणतेही शस्त्र न उचलता भारताला स्वतंत्र मिळवून देतात आणि स्वातंत्र्योत्तर काळात जय जवान जय किसान चा नारा देऊन भारतीयांना नवीन दिशा दाखवितात. या दोन्ही महापुरुषांनी आपल्या वयक्तिक आयुष्यात फार कष्ट झेलले आहेत. मेहनतीला पर्याय नसतात म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी भरपुर मेहनत घेऊन यशस्वी व्हावे असे प्रमुख वक्त्यांनी म्हटले. ही अभ्यासिका रोज सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुरू राहील. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.