ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात नवीन मतदार यादी व नोंदणी जनजागृती

भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक विद्यार्थी महत्वाचा : डॉ. विवेक शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचांलित डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात नवीन मतदार यादी व नोंदणी बाबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे सचिव डॉ. कार्तिक शिंदे , प्राचार्य प्रमोद पाठक, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, मा. नायब तहसीलदार मलिक खान व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पाठक यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक कपिल राऊत यांनी मांडले. या कार्यक्रमांमध्ये डॉ. विवेक शिंदे यांनी आपल्या भाषणात भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक विद्यार्थी किती महत्वाची आहे हे सांगितले.

डॉ. कार्तिक शिंदे यांनी आपल्या अनुभवातून मतदार यादी बाबत जनजागृती करण्याचे विद्यार्थी यांना सांगितले. प्राचार्य जयंत वानखेडे यांनी भारतीय नागरिक व कायदा याचे महत्व आपल्या भाषणातून मत मांडले. नायब तहसीलदार व इतर सर्व तहसील कर्मचारी यांनी महाविद्यालयाच्या अंतर्गत जे विद्यार्थी अठरा वर्षाचे झालेले आहे अशा सर्वांना मतदाराचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्याच्या दृष्टीने कागदपत्र गोळा करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापक नेहा मानकर मॅडम प्राध्यापक प्रज्ञा लांडे प्राध्यापक प्रीती मॅडम व इतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये