ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज येथे ग्राहक पंचायतचा सुवर्ण जयंतीवर्ष आणि नेत्ररोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न

६५ विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला मोफत नेत्ररोग तपासणीचा लाभ

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित, एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथे दि. २७ ला एफ ई एस गर्ल्स कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक पंचायत चा सुवर्ण वर्ष उद्गघाटन कार्यक्रम आणि नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रामुख्याने सुवर्ण वर्ष कार्यक्रमाचे उद्गघाटक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव नितीन काकडे, सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. गुंजन इंगळे (कांबळे) आणि एफ ई एस गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर च्या प्राचार्य डॉ. मिनाक्षी ठोंबरे, ग्राहक पंचायत चे जिल्हा संघटक वसंत वऱ्हाटे आणि जिल्हा अध्यक्षा नंदिनी चुनारकर उपस्थित होते.

आध्यवी नेत्रालय चंद्रपूर च्या डॉ. गुंजन इंगळे (कांबळे) यांनी उपस्थितांना डोळ्याची निगा राखणे, काळजी कशी घ्यायची म्हणजे डोळ्यांच्या आजारांचा सामना करावा लागणार नाही याबाबत माहिती दिली. आध्यवी नेत्रालय तर्फे रूग्णांना मोफत तपासणी आणि औषधी देण्यात आली. ज्या रूग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा रूग्णांना सवलती दरात शस्त्रक्रिया करण्याचे आस्वासन दिले.

डॉ. मेहरे यांनी उपस्थित विद्यार्थीनी, महाविद्यालय कर्मचारी आणि ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकाचे अधिकार, ग्राहकांची शक्ती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. नितीन काकडे यांनी विद्यार्थीनींना वेगवेगळ्या घटनांचे दाखले देऊन ग्राहक जागृत असला पाहिजे याकडे लक्ष वेधले. ग्राहक जागृत असला तरच ग्राहकांची फसवणूक होणार नाही असे मत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. मिनाक्षी ठोंबरे यांनी ग्राहक पंचायत चंद्रपूर आणि डॉ. गुंजन इंगळे यांचे आभार माणुन ग्राहक म्हणून ग्राहकांच्या हक्काची जाणीव असणे आवश्यक आहे आणि ते कार्य ग्राहक पंचायत करत आहे त्याबद्दल ग्राहक पंचायत चे आणि नेत्ररोग तज्ञ डॉ. इंगळे यांनी महाविद्यालयात मोफत तपासणी शिबीर घेतले याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. राजेंद्र बारसागडे यांनी केले, प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा जुनघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अंजली ठेपाले (धाबेकर) यानी केले. कार्यक्रमाला असंख्य विद्यार्थीनी, कर्मचारी, प्राध्यापक आणि ग्राहक पंचायतचे चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये