सेवाग्राम पोलीसांनी मांडवगड येथे पारधी बेडयावर 5 लाख 74 हजारावर दारुसाठा केला नष्ट
नागेशकुमार चतरकर पोलिस निरीक्षक सेवाग्राम यांची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेवाग्राम पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांनी वर्धा जिल्हात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध दारूविक्री आणि निमिर्तीच्या साखळीवर पुर्णपणे आळा घालण्यासाठी सेवाग्राम पोलीसांनी दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध वाॅशआऊट मोहीम यशस्वीरित्या राबवली या धडक कारवाईत पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे एकुण 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून सुमारे 5,74,500/- रुपयांचा दारुसाठा नष्ट करण्यात आला आहे.पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मांडवगड पारधी बेडयावर अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर गावठी मोहा दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याचीही गोपनीय माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर मांडवगड पारधी बेडयावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करून पाळत ठेवण्यात आली.
वर्धा जिल्हाचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व वर्धा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशन सेवाग्राम चे पोलिस निरीक्षक नागेश कुमार चतरकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुधकोहळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील झाडे पोलिस हवालदार सचिन सोनटक्के पोलिस हवालदार हरीदास काकड पोलिस हवालदार किशोर पेटकुले नायक पोलिस काॅस्टेबल स्वप्नील मोरे नायक पोलिस काॅस्टेबल धिरज मिसाळ पोलिस काॅस्टेबल प्रदिप कुचनकर पोलिस काॅस्टेबल चंद्रशेखर कोहचडे शुभांगी निघोट व चालक अजय वानखेडे यांनी व पंचांनी सकाळी 7 वाजता पासून सर्व गावठी दारु भट्टीच्या ठिकाणावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली या कारवाईत आरोपी क्र.(1) संदीप पवार (2)रिना अरविंद भोसले (3)नरसून सुरज काळे (4)सारीका पवार (5)चैनकला धनराज पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच या मोहिमेत नवीन कायद्यानुसार ई साक्ष ॶॅप्लिकेशन चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या वाॅश आउट मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत.



