वार्षिक निरीक्षण मध्ये देऊळगाव राजा पोलिस ठाण्याचे काम समाधाकारक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी देऊळगाव राजा येथील पोलिस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण 7 जानेवारी रोजी केले, त्यावेळी पोलिस स्टेशन मार्फत त्यांना मानवंदना देण्यात आली.
पोलिस स्टेशन हद्दीतील विविध गावाचा आढावा घेतला पोलिस पाटील यांना सुचना करण्यात आल्या, पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा दरबार घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
गणपती उत्सव, दुर्गा देवी उत्सव, बालाजी महाराज उत्सव, बालाजी महाराज मिरवणूक, बालाजी महाराज लळीत उत्सव, नगर परिषद निवडणूक मध्ये चांगले काम केल्याबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले. सर्व पोलिस स्टेशन व परिसराची पाहणी केली,पोलिस स्टेशनच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. निरीक्षण करत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम, पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी, उपस्थित होते.



