महिला सक्षमीकरण काळाची गरज – सेवा निवृत्त प्राचार्या स्मिता चिताडे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
युवा नेतृत्व व श्रमसंस्कार शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व ग्रामस्थ महिलांना महिला सक्षमीकरणाची आजही गरज आहे असे आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका तथा सेवानिवृत्त प्राचार्या स्मिता चिताडे यांनी ग्रामस्थ महिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका तथा सेवानिवृत्त प्राचार्या स्मिता चिताडे यांनी मार्गदर्शन केले तसेच एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे यांनीही मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा प्रदिप परसुटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयशा शेख व आभार तुषार पिंगे यांनी मानले याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.



