ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपर्डा ग्राम पंचायत १५ वित्तीय आयोग निधिचा गैरवापर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :_ पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पिपर्डा ग्रामपंचायत मध्ये15 वित्त आयोगाच्या आराखडा नियोजनाप्रमाणे कामे न करता आपल्या मर्जीतील कंत्रटदारामार्फत कुसळ येथील गावकुसाच्या बाहेर नाल्याच्या पूर रेषेच्या आतील भागात 15 वित्त आयोग अंतर्गत ओला सुका कचरा बांधकाम शेड लोकांच्या सोयीच्या ठिकाणी न घेता गावाबाहेर पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ नाल्याच्या पूर रेषेच्या आतील भागामध्ये बांधकाम करण्याचा सरपंच व सचिवांच्या ग्रामपंचायत सदस्यांना व स्थानिक सदस्यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीने कामाची सुरुवात करण्यात येत आहे.

याबाबत गावकऱ्यांनी सरपंच व सचिवांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ओला सुका कचरा हा गावकऱ्यांच्या धनकचरा व्यवस्थापनाचा भाग आहे की गाव नसलेल्या ठिकाणी नाल्यामध्ये ओला सुखा कचरा कोण टाकणार व सदर बांधकाम ग्रामपंचायतच्या आराखड्यानुसार कोणत्या ठिकाणी मंजूर आहे याबाबत गावकऱ्यांनी आक्षेप घेतला असून सरपंच व सचिवांच्या अडेलतटु धोरणामुळेगावाच्या विकासाचा बोजवारा झाला आहे.

डोंगरी विकास निधी अंतर्गत अंगणवाडी केंद्राला स्वच्छालय दुरुस्तीच्या नावावर निधीचा गैरवापर करण्यात आला असून तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट बांधकाम करून निधी अपहार करण्याचा सचिव सरपंचांचा उद्देश तर नाही ना पिपर्डा ही ग्रामपंचायतअनुसूचित जमाती पेसा क्षेत्रात असून पेसा ग्रामपंचायत मध्ये सर्वश्रेष्ठ ग्रामसभा आहे जल जंगल जमीन या सर्व मालमत्तेवर ग्रामसभेचा निर्णय अंतिम आहे मात्र ग्रामपंचायत क्षेत्रातील मोजा दहेगाव रिट या ठिकाणी मुरूम माती उत्खननकरिता ग्रामसभेमध्ये चर्चा न करता सचिव व सरपंचांनी संगणमत करून ना हरकत दिली याबद्दल येत्या 26 जानेवारीला वादंग निर्माण होणार असून गावकऱ्यांच्या व नागरिकांच्या अधिकारावर गदा आणून सरपंच व सचिव मनमानी करीत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.

तसेच सदर मुरूम गौण खनिज उत्खननाचा दिलेला नाहरकत ग्रामसभेला विश्वासात न घेता दिल्यामुळे तो ना हरकत रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये