ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्या!

शिवगंधा मटपती यांची तहसीलदाराकडे निवेदनातून मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती तालुक्यातील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी आवश्यक असलेली रेती नसल्याने अनेक घरकुलांचे काम अर्धवट राहिले आहे.तालुक्यात एकही रेतीघाट नसल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या शिवगंधा मटपती यांच्या नेतृत्वाखाली जिवतीचे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात घरकुल लाभार्थ्यांना तातडीने रेतीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.शासनाच्या घरकुल योजनेत मंजूर लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम सुरू केले आहे मात्र रेतीच्या टंचाईमुळे घरे अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करून लाभार्थ्यांना शासकीय दराने रेती उपलब्ध करून द्यावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीची मागणी आहे.

यावेळी जिल्ह्यातील रेती घाटातून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची विशेष व्यवस्था करून देण्यात यावी व पर्यायी व्यवस्था करून घरकुलधारकांना दिलासा द्यावा अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली प्रशासनाने यावर तातडीने योग्य निर्णय घेऊन घरकुल धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी अनेक घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये